

“माझ्या आयुष्यात आजपर्यंत फक्त तीन वेळा माझी ओळख (Identity) पूर्णपणे बदलल्यासारखी वाटली आहे. पहिली वेळ — जेव्हा मी CA परीक्षेत रँक मिळवला. दुसरी वेळ — जेव्हा माझा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर टॉपर ठरला. आणि तिसरी वेळ — निलेश बोम्बले सरांसोबत केलेला माझा १०० दिवसांचा आरोग्य परिवर्तनाचा प्रवास. या १०० दिवसांत फक्त माझं शरीर बदललं नाही, तर माझ्या सवयी, विचार करण्याची पद्धत आणि संपूर्ण जीवनशैली बदलली. आज fitness ही माझ्यासाठी एखादी तात्पुरती गोष्ट राहिलेली नाही, तर ती माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. माझ्या आयुष्यातील हा निर्णय माझ्यासाठी सर्वात मोलाच्या निर्णयांपैकी एक ठरला आहे. मनापासून धन्यवाद, निलेश सर!”






